बंधन
सध्या साधारण 3 महिने आपण सगळे घरात आहोत. जेव्हा लाॅकडाऊन चालू झालेलंतेव्हा आम्ही मूल थोडी-फार खुश झालेलो, कारण आता घरातच रहायचं, हव तेव्हा उठायच,झोपायचं, खायचं... पण आता जस जसे दिवस जावू लागलेत आम्हाला घरात थारा होईनासा
झालाय,कंटाळा येतोय, मित्र-मैत्रिणीना भेटावसं वाटतंय ,फिरावस वाटतंय अजून काय काय...
थोडक्यात आपल्याला मानसिक आणि वैचारिक थकवा आलाय. काही सुचेनासं होतंय ,घरात कोणीतरी कोडून ठेवल्या सारखं वाटतंय....
एका छोट्याशा न दिसणारा जीवाने आपल्याला निसर्गातल्या प्राणी,पक्षी,झाड यांच्या भावनांचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला दिलाय.ज्यांना जन्मापासूनच मुक्त संचाराच वरदान आहे त्यांना
आपण पिंजर्यामध्ये कैद करतोय. प्राणिसंग्रहालय,सर्कस, गोठ्यात,घरात...आपण त्यांना बांधतोय आणि त्यातून त्यांचे राखणदार जर त्यांच्याशी अमानुषपणे वागत असतील तर
आपण त्यांच्या जखमेवर मीठ लावतोय.
पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या प्राण्याला बंदी बनवणं चुकीचे आहे आणि त्यात करून तुम्ही त्यांना माया , प्रेम देवू शकत नसाल तर त्यांना का बंदी बनवताय??
आपणही प्राणी आहोत हे विसरू नये म्हणून त्याची जाणीव व्हावी म्हणून आपल्याला चुकांच स्मरण व्हावं म्हणून हा कोरोना आला असावा. जर आपल्याला कोणावर मायेने हात फिरवता येत नसेल तर निदान त्या हातांनी कोणाला बांधून ठेवू नका.

Khup sundar 👌👌 shreyu
ReplyDeleteKhup chaan
ReplyDelete👍👍👍👌👌
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteNice 👏
ReplyDelete😊nice
ReplyDeleteखूप सुंदर..
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteNice👌👍
ReplyDelete👍👍👌👌
ReplyDeleteVery nice information, 👍👍congratulations shreya 😊😊
ReplyDelete👌
ReplyDeleteNice👍👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर . 👍
ReplyDeleteखूप छान लिहाल श्रेया
ReplyDeleteNice lines
ReplyDeleteअप्रतिम लिहिलेस
ReplyDeleteaprtim bhai
ReplyDeletemast bhsi
ReplyDeleteGreat, very nice...
ReplyDeleteKeep it up 👍👌